नागपूरमधल्या आपल्या निवासस्थानी आपल्या खुर्चीवर (सर्वसामान्य याला कोच म्हणतात)
बसलेल्या राष्ट्रीय अध्यक्षांचा मोबाईल फोन वाजला. आता या क्षणी कोणाचा फोन म्हणून
त्यांनी मोबाईलच्या स्क्रीनवर बघितले. डोके जेवढे चालविता येते, तेवढे चालवून
बघितले; पण नंबर काही लक्षात येईना. मोहनदर्शन चारच दिवसांपूर्वी झाले होते,
इतक्यात तिकडून बोलवणे येणे शक्य नाही, याची त्यांना खात्री होती. वरळीपासून
परळीपर्यंत आता चिंता नव्हती, मग फोन कुठून असणार.
राष्ट्रीय अध्यक्षांना उगाचच राग आला. अरे, या मोबाईलवरून काहीच कळत नाही, फोन कुठला ते. लॅंडलाईन असेल तर नेमके कळते तरी की, फोन कुठल्या राज्यातील, कुठल्या गावातील. अध्यक्षांनी स्वतःच त्रागा करून घेतला. फोन उचलावा तरी पंचाईत आणि न उचलावा तरी. न जाणो, उत्तर प्रदेशमधील मंत्र्याबाबतच्या घोटाळ्याची बातमी द्यायला कोणी फोन केला असेल तर. पण तरीही त्याचा आता आपल्याला उपयोग नाही. आपल्याला काही त्याचा फार पाठपुरावा करायला जमणार नाही. पण आपले एक खंदे कार्यकर्ते आहेत की. एकदा का माहिती त्यांना मिळाली, की मंत्र्यांच्या डोक्यावरचे "किरीट' कसे खाली खेचायचे हे त्यांना चांगलेच कळते. त्यांना परस्पर हा नंबर द्यावा. पण न जाणो, आपल्यासाठी काही तरी असेल तर... सलग सातवा मिस कॉल पडल्यावर मग मात्र अध्यक्षांची चलबिचल झाली. आता फोन उचलायलाच हवा. या लोकांना कोण देतं हा पर्सनल नंबर कोण जाणे? राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःशीच पुटपुटले आणि त्यांनी फोन कानाला लावला.
""नमस्कार साहेब, मी आपला... हा अमुक तमूक...''
""बोला काय काम होतं...?'' अध्यक्षांनी नाराजीचा सूर कायम ठेवला.
""काही नाही.. तुमची आठवण झाली. बाकी तुमचे आरोग्य मात्र आता चांगलेच दिसते आहे. जरा हलकेही वाटायला लागला आहात.''
राष्ट्रीय अध्यक्षांना ही स्तुती प्रचंड आवडली. त्यांनी आपले बाहेर आलेले पोट थोडे आणखी आत घेतले. कसंचं कसंचं ... भाव चेहऱ्यावर आणत आपल्या तलवारकट मिशांतून स्मित केलं; पण फोनवरून त्या माणसाला ते कळलं नाही.
साहेब चुकून रागावले की काय, असे वाटून त्यानं सरळ सांगून टाकलं.
""साहेब, आरोग्य योजनेबद्दल नाही बोलत, तर तुमच्या आरोग्याबद्दल बोलतो आहे.''
आरोग्य योजनेबद्दल... काय ही काय भानगड आहे. अध्यक्षांना नेमके कळेना, हा काय बोलतो आहे.
""काही नाही साहेब, परवाच्या त्या पक्षप्रवेशाने पक्षातील आरोग्य बिघडले असल्याची चर्चा सगळीकडे घडते आहे. आपल्याच कार्यकर्त्यांनी ज्यांच्या डोक्यावरचा "किरीट' उतरवला, त्यांनाच तुम्ही कमळाचा मुकुट घातला. लोकांची "आड'"वाणी'ही आता सरळ बोलू लागली आहे. ते मोठे साहेब यात्रा काढून आरोग्य सुधारण्याच्या गोष्टी करताहेत आणि तुम्ही येईल त्याला मुकुट घालताहात.''
""हेऽऽ हेऽऽ सांगण्यासाठी मला तू फोन केलास... या वेळी...?'' राष्ट्रीय अध्यक्षांनी घड्याळाकडे बघत पुन्हा दटावणीच्याच सुरात प्रश्न केला.
""नाही साहेब...'' फोनवरचा माणूस अगदी लीन होऊन म्हणाला. ""तिकडे कितीही चर्चा झाल्या तरी त्याचा आपल्याला कायपण तोटा नाही. पण "रेशीमबागेत' याबाबत चर्चा आहे.''
राष्ट्रीय अध्यक्ष ताडकन् जाग्यावरून उठले. (खुर्चीला काही क्षण का होईना बरे वाटले) पुन्हा खाली बसले. ""कोण आहे तिकडे...?'' एक स्वयंसेवक पुढे झाला.
""काय रे काय? शाखेत माझ्याबद्दल काही चर्चा-बिर्चा असतात का?''
""नाही साहेब? पण एक डायलॉग मात्र नागपुरात आता प्रत्येक स्वयंसेवकाच्या तोंडात आहे.''
"काय?''
""मोगॅम्बो ना खुश (कुश) हुआ''

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा