समस्त कुलकर्ण्यांची माफी मागून....
मला नेहमी प्रश्न पडायचा की नावाच्या शेवटी जे काही आपण लावतो त्याला आडनाव का म्हणायचं. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मी खूप पुस्तके चाळली, अनेक लोकांना भेटला पण समाधान करेल असे उत्तर मिळाले नाही. एखाद्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही की मला कुलकर्णी आडनावं आठवतात. जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे असतातच या आविर्भावात ते असतात.त्यामुळे या प्रश्नाचे उत्तरही त्यांच्याकडे असावे हे मानून मी एका कुलकर्ण्याला हा प्रश्न पुसला. पहिल्यांदा मी प्रश्न पुसला आणि नंतर त्याने आपल्या ज्ञानाचा बोळा माझ्या मेंदवारुन फरशीवरुन फडकं पुसावं तसा पुसला. आहे हो.... काय आहे त्यात.... आडनाव का म्हणतात तेच ना आहे की उत्तर आहे ... कुलकर्ण्यांनं आपल्या पोटावरुन हात फिरवत उत्तर दिलं.हे बघ... (पुढचा माणुस कितीही लहान असो वा मोठा त्याला एकेरी हाक मारण्याची यांची कसब वादातीत आहे.... )जे नाव इतरांच्या प्रगतीच्या आडवे येतं ते आडनाव.... कुलकर्ण्यांनं आडनावाची केलेली ही व्याख्याआपल्याच आडनावरुन केल्याचं कोणाच्याही लक्षात येईल. पण खरेच आहे ही व्याख्या इतरांना लागू पडो अथवा न पडो पण समस्थ कुलकर्ण्यांना लागू पडते हे निश्चित......अहो! काही म्हणा महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर पाटील आणि कुलकर्णी इतरांच्या कायम आड येऊन उर्वरितांना विहिरीत कसे ढकलायचे याचाच विचार करत असतात की काय असा प्रश्न मला पडत आला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात निम्मे पाटील आणि उरलेले कसले तरी खरे तर कसलेले पाटील असल्याने सत्तेत असलेल्यांबद्दल आम्ही बोलत नाही. त्यामुळे पाटलांच्या आड जाणे आम्हाला परवडण्यासारखे नसल्याने आम्ही त्यांचा आडा आडानेच उल्लेख करतो. पण कुलकर्णी ना सत्तेत ना विद्वत्तेत. तरीही आपलं घोडं पुढं दामटायचं यांना चांगलं माहित.आता परवाचीच गोष्ट एक ग्रहस्थ बसमधुन निघाले होते.... गाडी तशी रिकामीच त्यामुळे आपले बाकड्यावर जरा पसरुनच बसले होते... एका बाजुला पिशवी... पिशवीतून डोकावणारी शेवग्याची शेंग... त्या पिशवीचा तुटलेला एक बंध आणि तो दुसऱ्या बंधाला बांधलेला... आता हा इसम अशा अवस्थेत पसरुन बसल्यावर तो कुलकर्णीच असणार यात शंका घेण्याचे कारण नाही... एवढ्यात दुसरा एक माणुस बसमध्ये चढला... इतकी गाडी रिकामी असूनही त्याला तो बाकडाच आवडला...सरका?आता त्याचा तो आवाज आणि सरका म्हणण्याच्या पध्दतीवरुन तो पाटील असणार हे नक्कीच... पण लगेच ऐकतील ते कुलकर्णी कसले... क्यॉ पुढे जागा नाही.... आता गप्प सरकून बसायचं का नाही....पण बदकाच्या क्यॅ क्यॅ प्रमाणे कुलकर्ण्यांने आपला चोमडेपणा केलाच....का जागा तुझ्या बापाची आहे....आता मात्र कुलकर्ण्या भ्याला... आपला लेचापेचा दंड दाबत त्याने पिशवी उचलली..प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची सवयच यांना लागलेली असते. एकुणच कुलकर्णी ही जमात विलक्षण वेगळी.. यांची तऱ्हाच निराळी.... वर्षानुवर्षे कारकुनी केल्याने यांच्या रक्तातच कारकुनी भिनलीय की काय असा प्रश्न पडतो... म्हणजे एखाद्या कुलकर्ण्यांनं जर मान मोडली तर त्यातून कार कुन कार कुन... असाच आवाज येतो की काय हे बघायला पाहिजे....कुठल्याही वर्गातील पोरांना तू मोठेपणी कोण होणार असं विचारा.... जे पोरगं ठोसपणे नोकरी म्हणतंय ते कुलकर्णी आहे हे बीनदिक्कत समजायचे..... कुलकर्ण्यांची पोरं.....इंजिनिअरिंगपासून एमबीबीएसपर्यंत शिक्षण घेतील आणि परत आएएसच्या परीक्षेला बसून नोकरीच करतील.... कुलकर्ण्यांच्या बायकांची तऱ्हाही निराळी असते.. कधीही बघा... चार कुलकर्ण्यांच्या बाया एकत्र आल्या की त्यांच्यातील संवाद ऐकायचा.... ती भटीन... आता ही भटीन म्हणजे जोशी आडनावाची कोणतरी बाई असणार हे नक्की.... ती नोडगीन आता ही नोडगीन म्हणजे कोण हे मात्र त्या गावातील इतर आडनावांर अवलंबून म्हणजे सरदेसाई, सोनटक्के अशा अडनावांच्या बायकां... कुलकर्णी सोडून इतर सर्व बायकांना यांच्या काही ना काही उपाध्या असतातच... वन्स, वहिनी, आणि काकू असा उल्लेख ज्या बायकांचा होतो त्या कुलकर्ण्यांच्याच कोणीतरी असणार हे नक्की...पण काही म्हणा ज्या गावात कुलकर्णी आणि पाटील या आडनापैकी जर एक आडनाव गावात नसेल तर शिळोप्याच्या गप्पात पाटलाचा पोर आणि कुलकर्ण्याची पोरगी आणायची कोठून........
२ टिप्पण्या:
नमस्कार,
पोस्ट interesting वाटली, पण त्यापेक्षा तुमचं about me फार फार आवडला.
हा हा... मस्त.
टिप्पणी पोस्ट करा